सना खानला जामीन

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेली सिने अभिनेत्री सना खान हिचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश ए. एच. वाघवसे यांनी मंजूर केला.

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेली सिने अभिनेत्री सना खान हिचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश ए. एच. वाघवसे यांनी मंजूर केला. तसेच तिला आठवडय़ातून एकदा तुर्भे पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले. मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्याविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ती फरार होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sana khan get bail