राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडल्यानंतर आज शिंदे गटाचे वकील आपली त्यांची बाजू मांडतील. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंचा सपशेल गौतमभाई अदानीच झालाय”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणे, “असे ‘मोदीछाप’ विधान…!”

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

काय म्हणाले संजय राऊत?

“मुळात हा सत्तासंघर्ष नाहीच. ही चोरांबरोबरची लढाई आहे. या चोरांना केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने बळ दिलं आहे. या चोर, डाकू आणि केंद्रातील त्याचे सरदार यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच हा संघर्ष सुरूच राहणार असून ही सत्याची लढाई आहे”, असेही ते म्हणाले.

सिसोदियांवरील कारवाईवरून मोदी सरकारवर टीकास्र

यावेळी बोलताना त्यांनी मनिष सिसोदियांवरील कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “दोन तासांसाठी सीबीआय किंवा ईडी कुणाकडेही आली, तर तो देशाचा बादशाह होईल. पण हे लोकशाहीला धरून नाही. आजही अलोकशाही पद्धतीने हा देश चालतो आहे. फक्त विरोधी पक्ष आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जातो आहे. तुमच्या पक्षात फक्त संत-महात्मे बसलेत का की जे दररोज हिमालयातून मंत्रालयात अप-डाऊन करतायत?” अशी टीका खोचक टीकास संजय राऊतांनी केली.

आशिष शेलारांना राऊतांचे प्रत्युत्तर

“तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या मद्यधोरणावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होत. यासंदर्भात राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आशिष शेलारांनी हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. त्यांनी गेल्या ६ महिन्यातलं बोलावं. नगरविकास खात्याबाबत तुम्ही याचिका दाखल केली आहे. त्यात काय म्हटलंय त्यांनी? तो कुणाचा घोटाळा आहे. त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वाखाली तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. एनआयटी घोटाळा काय आहे हे आशिष शेलारांनी सांगावं”, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा – दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? आशिष शेलारांचं ट्वीट चर्चेत!

“आज शिवगर्जना मोहिमेत सहभाग होणार”

दरम्यान, “मी आजपासून शिवगर्जना मोहिमेसाठी निघालो आहे. निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आमच्याकडचं शिवसेना हे नाव गेलं. पण जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. या जनतेला अभिवादन करण्यासाठी आणि शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी शिवगर्जना मोहीम सुरू करण्यात आली आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.