Dasara Melava : ...तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; 'मातोश्री'वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट | Sandeep Deshpande big allegation on Uddhav Thackeray about Shivsena MNS alliance | Loksatta

Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे राज ठाकरे ( संग्रहित फोटो )

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा शिवसेना मनसे युतीचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, तशी युती वास्तवात उतरू शकली नाही. याबाबत कुणी कुणाला टाळी द्यावची हे वक्तव्य चांगलंच गाजलं. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाष्य केलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.”

“युतीबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”

“त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं,” असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला.

“खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची सवय जुनी”

“बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“इतरांच्या अनुभवावर मी बोलू शकत नाही, पण…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर प्रकरणात केलेल्या आरोपावर संदीप देशपांडे यांनी बोलणं टाळलं. इतरांच्या अनुभवावर मी बोलू शकत नाही, पण मी स्वतःचा अनुभव सांगू शकतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

हेही वाचा : Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

संदीप देशपांडे म्हणाले, “आनंद दिघेंबाबत त्यावेळी काय झालं आणि काय नाही हे मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. जो अनुभव माणसाला स्वतःला येतो त्यावर बोलू शकतो, जो इतरांचा अनुभव आहे त्यावर मी बोलू शकत नाही.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
“त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस…”, महिला मुख्यमंत्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा टोला
Maharashtra Karnataka Border Dispute : “हा संपूर्ण विषय मी अमित शाहांच्या कानावर घालणार आहे, कारण…”; देवेंद्र फडणवीसांचं विधान!
पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…
‘फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवी नगरपालिका’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
“कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्र…”, सीमावादावरून सुषमा अंधारे आक्रमक, भाजपावर गंभीर आरोप
Himachal Pradesh Election 2022 : अपक्ष उमदेवार ठरणार ‘किंगमेकर’?, भाजपा-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी अटीतटीची लढाई!