scorecardresearch

Premium

‘संगीत देवबाभळी’चे विश्वविक्रमी महोत्सवी प्रयोग

प्राजक्त देशमुख लिखित – दिग्दर्शित आणि भद्रकाली निर्मित ‘संगीत देवबाभळी’ या रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आगळ्यावेगळ्या नाटकाचे शेवटचे महोत्सवी प्रयोग सध्या सुरू आहेत.

Sangeet Devbabhali
‘संगीत देवबाभळी’चे विश्वविक्रमी महोत्सवी प्रयोग (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुंबई : प्राजक्त देशमुख लिखित – दिग्दर्शित आणि भद्रकाली निर्मित ‘संगीत देवबाभळी’ या रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आगळ्यावेगळ्या नाटकाचे शेवटचे महोत्सवी प्रयोग सध्या सुरू आहेत. कार्तिकी एकादशीला नाटकाचा पाचशेवा प्रयोग झाल्यावर हे नाटक थांबणार आहे. तत्पूर्वी या नाटकाचे महोत्सवी प्रयोग निरनिराळ्या नाट्यगृहांतून सादर होणार आहेत.

त्यापैकी रविवार, १ ऑक्टोबरला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दुपारी ४.३० आणि रात्री ८.३० वाजता असे दोन प्रयोग सादर होणार आहेत. तर सोमवार, २ ऑक्टोबरला दादरच्या श्री शिवाजी मंदिरात सकाळी ११.३० वाजता, दुपारी ३.३० वाजता आणि रात्री ७.३० वाजता त्याचे प्रयोग होणार आहेत. रविवार, १५ ऑक्टोबर रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता, दुपारी ४.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता असे ‘संगीत देवबाभळी’चे तीन प्रयोग होतील. त्याचप्रमाणे रविवार, ८ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ‘संगीत देवबाभळी’चे तब्बल पाच विश्वविक्रमी महोत्सवी प्रयोग सादर होणार आहेत. सकाळी ७.३० वाजता, सकाळी ११.३० वाजता, दुपारी ३.४५ वाजता, सायंकाळी ७ वाजता आणि रात्री ९.३० वाजता असे हे पाच विक्रमी प्रयोग एकाच दिवशी सादर होणार आहेत.

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
lokrang 8
बहुआयामी कलाकाराचे चित्र-शब्द दर्शन
ganeshotsav
Ganeshotsav 2023: काश्मिरचा सुंदर दल लेक अन् हाऊसबोटीत टिळकनगरचा बाप्पा!; देखाव्यासाठी अनोखी कलाकृती
teen adkun sitaram marathi movie cast visit loksatta office for film promotion
मैत्रीतल्या जांगडगुत्त्याची विनोदी कथा

हेही वाचा – “भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

हेही वाचा – ‘तिजोरी’ भरण्यासाठी वाट्टेल ते? कोतवाल व्हायचे तर पाचशे रुपये शुल्क, अर्जही फुकट नाही

‘संगीत देवबाभळी’ला आजवर असंख्य नाट्यपुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले असून अनेक विद्याापीठांतील अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangeet devbabhali record jubilee theatrical experiment mumbai print news ssb

First published on: 26-09-2023 at 16:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×