संजूबाबाच्या अर्जावर ‘टाडा’ न्यायालयाचा आज निर्णय
मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याने पुन्हा विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे धाव घेत आपल्या जीवाला मूलतत्त्ववाद्यांकडून धोका असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपल्याला न्यायालयाऐवजी येरवडा कारागृहात शरणागती पत्करण्याची मुभा द्यावी, अशी विनंतीही त्याने केली आहे. न्यायालयाने सीबीआयला त्याच्या अर्जावर बुधवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्या़  जी. ए. सानप यांनी हे आदेश दिल़े
संजय दत्तच्या वतीने तो काम करीत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून त्याला शरणागतीसाठी आणखी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळण्यात आल्यानंतर काहीच वेळाने संजूबाबाने विशेष ‘टाडा’ न्यायालयात धाव
घेतली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शरणागतीसाठी दिलेली मुदत संपत असून १६ मे रोजी तो शरणागती पत्करण्याची शक्यता आहे.