scorecardresearch

Premium

“वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाला, तर…”, अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देताना वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाला तर असं म्हणत टोला लगावला. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut Amit Shah Rahul Gandhi
अमित शाहांनी महिला आरक्षणावरून केलेल्या एका वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हे विधेयक त्वरित लागू करायला हवं, अशी मागणी केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देताना वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाला तर असं म्हणत टोला लगावला. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (२१ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या भूमिकेवर आम्ही स्पष्टीकरण दिलं आहे. महिलांसाठी सरसकट ३३ टक्के मतदारसंघ राखीव करण्यापेक्षा राजकीय पक्षांवर ३३ टक्के महिला निवडून आणण्याची जबाबदारी टाकावी, बंधन टाकावं अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती.”

Nana patole open up on Will Priyanka Gandhi contest in Pune Lok Sabha
पुणे लोकसभा प्रियांका गांधी लढणार का? नाना पटोले म्हणाले, “हायकमांड…”
TMC-leader-and-Minister-Rathin-Ghosh
ईडीचा कचाट्यात तृणमूल काँग्रेसचा आणखी एक मंत्री; ममता बॅनर्जींच्या विश्वासू नेत्यावर कारवाई
Ambadas Danve Narendra Modi Amit Shah
“मोदींनी स्वतःच्या पैशाने जनधन खाती उघडली का?”, अंबादास दानवेंचा प्रश्न, म्हणाले, “हा पैसा…”
gajendra singh shekhawat
सनातन धर्मावरील वाद मिटेना ! DMK च्या उदयनिधी, के. पोनमुडी यांच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान !

“अमित शाह काहीही करू शकतात”

“अमित शाह चेष्टेने असं म्हणाले की, उद्या वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यावर तुम्ही आमच्यावर आरोप कराल. मात्र, ते काहीही करू शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. ते वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करू शकतात. अशाप्रकारे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये बसलेले पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“महिलांचा सन्मान, महिलांना अधिकार म्हणून विधेयकाला पाठिंबा”

“असे अनेक नेते आहेत जे विरोधी पक्षात आहेत किंवा भाजपात असतील, त्यांना या विधेयकामुळे सभागृहात येणं कठीण होईल. असं असलं तरी आम्ही सर्वांनी महिलांचा सन्मान, महिलांना अधिकार म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

हेही वाचा : “वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाला तर?” अमित शाहांचा राहुल गांधींना प्रश्न

“कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही”

भावना गवळींनी मंत्रिमंडळातही महिलांना आरक्षण असावं अशी भूमिका व्यक्त केली. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “ती त्यांची भूमिका असू शकते. कर्तबगार महिला सरपंचपदापासून संसदेपर्यंत आपल्या कर्तबगारीवरच निवडून येत असतात. कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही हा आमचा अनुभव आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut comment on amit shah wayanad women reservation statement pbs

First published on: 21-09-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×