Sanjay Raut Criticized BJP over Remark on Chhatrapati Shivaji Maharaj : राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीकरून राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनीही भाजपावर सडकून टीका केली आहे. १९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे, त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल, असे ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ आल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मागितली माफी, म्हणाले, “तो व्हिडीओ…”

“१९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे. त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावे लागेल. आशिष शेलार म्हणतात, ‘अरे’ ला ‘कारे’ करतो. मात्र, आधी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवात जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा ‘कारे’ तुम्ही शिवरायांचा अपमान करता? आधी ‘कारे’ तिथे विचारा, मग बाकीच्या गोष्टी करा, पण तुमच्या मनगटात तेवढी ताकद नाही. रोज उठून शिवरायांचा अवमान करता, त्यांचा इतिहास तुडवता”. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – “या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे”; शिवसेनेचा खळबळजनक दावा

यावेळी त्यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाचाही समाचार घेतला. “शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, काल भाजपाने नवा शोध लावला आहे. त्यांनी शिवनेरीवर फुली मारली आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकले आहे. मुळात त्यांना शिवाजी महाराज तरी मान्य आहेत का?” यांच उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा

“सीमावादाच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली. शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमारेषेला किमान स्पर्ष तरी करून यावा, बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण यांच्यात हिंमत नाही. हे हतबल लाचार लोकं आहेत. हे काहीही करू शकत नाही. आम्हाला शिव्या घालातात, हिंमत असेल तर बोम्मईंना शिव्या घालून दाखवा, शिवरायांचा इतिहास तोडणाऱ्यांना शिव्या घालून दाखवा”, असे आव्हानही त्यांनी दिले. शिवरायांचा अवमान असेल किंवा कर्नाटक सीमाप्रश्न असेल, हे सरकार भूमिकाच घेऊ शकत नाही. ही शेवटी असलेली माणसं आहेत. मात्र, प्रत्यक्ष वेळ आली की हातभर शेपटी आत घालतात”, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

“शिवरायांचा अवमान असेल किंवा कर्नाटक सीमाप्रश्न असेल, हे सरकार भूमिकाच घेऊ शकत नाही. ही शेवटी असलेली माणसं आहेत. मात्र, प्रत्यक्ष वेळ आली की हातभर शेपटी आत घालतात”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – पंतप्रधानाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलले; समृध्दीसह अनेक अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार

दरम्यान, त्यांनी गुजरात निवडणुकीवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडले. “पंतप्रधानांनी प्रचारासाठी बराच वेळ गुजरातला दिला आहे. खरं तर गुजरात हे विकासाच्या मार्गावर चालणारे राज्य आहे. त्यामुळे भाजपाने कोणत्याही प्रचाराशिवाय ही निवडणूक लढायला हवी होती, तहीही पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये प्रचार केला. मात्र, हा निकाल काय लागतो हे कोणीही सांगू शकत नाही”, असे ते म्हणाले.

“लोकं म्हणतात निवडणूक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही. ही लोकशाही आहे. मशीन गडबड करून किती करणार ही लोकांनी भावना आहे. गुजरात विकासाच्या मार्गावर आहे. तरी प्रचार करावा लागत असेल आणि विरोधकांवर टीका करावी लागत असेल, याचा अर्थ लोकं तुमच्या विरोधात आहे, लोकांमध्ये नाराजी आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized bjp over statement on shivaji maharaj by bhagat singh koshyari spb
First published on: 05-12-2022 at 10:55 IST