Toilet Scam Case: शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊतांविरोधात शिवडी न्यायालयाने अजमीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काही जणांना अजामीनपात्र वॉरंट काढलं यामध्ये फार मोठी गोष्ट वाटते. आम्ही न्यायालयासमोर हजर राहू शकलो नाही, याचा मलाही खेद आहे. मी आमच्या वकीलाला सांगितलं आहे, की ताबडतोब न्यायालयात जाऊन विनंती करा की उच्च न्यायालयात एक विषय होता. तिथून मला इथे येण्यास खूप वाहतूक कोंडी असल्याने मी पोहचू शकलो नाही. असं संजय राऊत म्हणाले.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
pragya singh thakur
Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

हेही वाचा – मोठी बातमी! संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; २४ जानेवारीला पुढील सुनावणी

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.