पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीमधून राऊत यांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी त्यांनी न्यायालयाबाहेर बाकड्यावर बसून लिहिलेल्या या पत्रात राऊत यांनी आपल्याविरोधात बळजबरीने जबाब नोंदवून घेतले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

या पत्रामध्ये राऊत यांनी ईडीची धाड पडली त्या दिवशी नेमकं काय घडलं. शिंदे गटाने शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा राऊत यांच्या घरी काय परिस्थिती होती याबद्दल सविस्तर भाष्य करताना आपण झुकणार नाही असं म्हटलं आहे. “घरावर शिवसेनेचे व स्वाभिमानेच बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू?” असा प्रश्न राऊत यांनी आपल्या पत्रात विचारला आहे.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

“मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’,’इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मली बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटो आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट’वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

नक्की वाचा >> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”

तसेच, “अप्र्त्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?” असा प्रश्न राऊत यांनी पत्रात विचारला आहे.

नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”

मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागते. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का? असंही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

“रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले, तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस. हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणाली, खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या ठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता,” असंही राऊत यांनी छापेमारीच्या दिवसाची आठवण सांगताना म्हटलंय.