scorecardresearch

Premium

“मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण गुंडाळलं होतं, असा आरोप केला.

Sanjay Raut Manoj Jarange Anna Hazare Girish Mahajan
संजय राऊतांनी अण्णा हजारेंचा उल्लेख करत भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसणाऱ्या मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंची भेट घेत त्यांना आश्वासन दिलं. या भेटीनंतर महाजनांनी जरांगे पाटलांनी १ महिन्याचा वेळ दिल्याचं विधान केलं. दुसरीकडे मनोज जरांगेंनी सरकारला चार दिवसांचा वेळ दिल्याचं म्हटलं. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. तसेच गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण गुंडाळलं होतं, असा आरोप केला. ते गुरुवारी (७ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी त्यांचा प्राण पणाला लावला आहे. कधीकाळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारे यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात उपोषण केलं होतं. तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी करायला होते. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. भ्रष्टाचार जोरात आहे. गिरीश महाजन फक्त अण्णांना गुंडाळून आले. मात्र, मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती गुंडाळली जाणारी नाही.”

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील यांनी नव्या लोकांना जुन्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवले; कोल्हापुरातील भाजपाच्या निष्ठावंतांचा आरोप
Chief Minister Ashok Gehlot and former Deputy CM Sachin Pilot
गहलोत-पायलट यांच्यात दिलजमाई; पण कार्यकर्त्यांमध्ये मनभेद कायम, काँग्रेससमोर आव्हान
rashmi thackeray get warm welcome in kalyan
रश्मी ठाकरे यांचे कल्याणमध्ये जोरदार स्वागत
Eknath Shinde Rishi Sunak Uddhav Thackeray
ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

हेही वाचा : “ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान

“भाजपा नेत्यांनी त्यांची गंडवागंडवी इथे करू नये”

“मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. एवढ्या साध्या माणसाने मराठा समाजाच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला जेरीस आणलं. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांची गंडवागंडवी इथे करू नये. खरं बोला, सत्य बोला आणि समाजाला न्याय द्या,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut mention anna hazare criticize bjp girish mahajan pbs

First published on: 07-09-2023 at 12:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×