तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.

Sanjay Raut reaction after Samin Wankhende denied the allegations

भाजपामधले काही फुटकळ लोकं धमक्या देत आहेत. असे लोक ज्यांचा भाजपाशी काही संबध नाही जे मुळ भाजपा मधले नाहीत, ज्यांना भाजपा माहित नाही, विचारधारा माहीत नाही ते लोक धमक्या देत आहेत. रोज उठतात आणि बोलतात ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, तुरुंग विकलेत का?,  तुरुंग तुमच्या बापाचं आहे का?  की तुरूंगाच खासगीकरण केलं आहे?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक जागांचं खासगीकरण केलं आहेच. आता तुरूंगाचं सुद्धा खासगीकरण केलं आहे का? असा सवाल करत  त्या तुरुंगाच्या चाव्या बाहेरून आलेल्या काही लोकांकडे दिल्या आहेत का? असा प्रश्न विचारला. तसेच तुरुंगाचं खासगीकरण केल असेल तर तसं समोर येऊन सांगा, असं ते म्हणाले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. आज याचा नंबर, उद्या त्याचा नंबर म्हणता, तर तुम्ही कायद्याचे पण मालक झाले आहात का? असा प्रश्न विचारत लक्षात ठेवा उद्या तुमचा पण नंबर येईल, असं बजावून सांगितलं.

तुरुंगांचेच खासगीकरण झाले काय?

दरम्यान, राज्यात तुरुंगांचेच खासगीकरण झाले आहे का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. “आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. ईडी, सीबीआय, एनसीबी ज्या पद्धतीने काम करतंय, ते पाहाता त्यांचंच खासगीकरण झाल्याचं चित्र आहे. राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut slams bjp leaders statement over jail hrc

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या