शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असणाऱ्या शरद पवारांवर भाजपा आणि मनसेकडून आरोप केले जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही असं सांगतानाच पुढील २५ वर्ष राज्यात भाजपा सत्तेत येणार नाही असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> सोमय्यांनी पत्नीच्या मदतीने १०० कोटींहून अधिकचा ‘टॉयलेट घोटाळा’ केल्याचा आरोप; संजय राऊत म्हणाले, “कागद पाहून…”

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विक्रांत घोटाळ्यावरुन भाजपावर निशाणा साधलाय. यावेळी राऊत यांनी न्यायव्यवस्थेबद्दलही नाराजी व्यक्त केली. किरीट सोमय्यांना दिलासा मिळाल्याबद्दल राऊतांनी नाराजी बोलू दाखवली. राज भवनाच्या पत्रानंतर पुरावे कसले मागता, असा सवाल राऊत यांनी विचारलाय.

तसेच लवकरच आपण भाजपाचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा उघड करणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. किरीट सोमय्यांनी आज दुपारी महाविकास आघाडी सरकारचा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी टॉयलेट घोटाळ्यावरुन फडणवीसांना उत्तरं देत बसावं लागणार असल्याचं वक्तव्य केलंय. “भाजपाचा टॉयलेट घोटाळा सुद्धा महाराष्ट्रात दुर्घंधी निर्माण करणार,” असा टोला राऊतांनी लगावलाय.

नक्की वाचा >> “महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे न्यायपालिकांनी तरी…”; शिवसेनेचा संताप

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या १४ ट्विट्सच्या पार्श्वभूमीवर पवार धर्मांध आणि जातीयवादी आहेत, अशी टीका मनसे आणि भाजपाकडून केली जात असल्याचा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ” ठाकरे सरकार पडत नाही पडणार नाही म्हणून वैफल्यातून हे आरोप केले जात आहेत. हे केवळ आरोप आहेत. सरकार पडणार नाही आणि पुढील २५ वर्ष भाजपाला सत्ता मिळणार नाही,” असं राऊत म्हणालेत.

विक्रांत घोटाळ्यामधील ५७ कोटी रुपये कुठे गेले ते सांगा, अशी मागणी राऊत यांनी भाजपाकडे केलीय. ५७ कोटी जाऊ द्या ५७ रुपयांचा तरी हिशोब द्या असा टोला राऊतांनी लगावलाय. “न्यायादेवतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी त्या पट्टीला छिद्र पडलं आहे त्यातून ती समविचारी लोकांकडे पाहत आहे,” असं राऊत यांनी न्यायालयावर टीका करताना म्हटलंय.

नक्की वाचा >> “भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून एका रांगेत दिलासे कसे मिळतात?; न्यायव्यवस्थेवर कोणाचा…”; राऊतांनी उपस्थित केले प्रश्न

सोमय्यावर टीका करताना राऊत यांनी, “पीएमसी घोटाळ्यातील राकेश वाधवानची जमीन तुमच्या मुलालाच कशी मिळाली?,” असा प्रश्न उपस्थित केलाय. “आता तपासाला सुरुवात झालीय. असे अनेक घोटाळे बाहेर येणार आहेत. आरोपी हवेत गोळीबार करत आहेत,” असंही राऊथ यांनी सोमय्यांबद्दल बोलताना म्हटलंय.