शिवसेना खासदार संजय राऊत यांची रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजल्यापासून चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं. तसेच त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जात असताना संजय राऊतांनी अचानक माध्यमांशी संवाद साधला. तसेच ईडीच्या कार्यालयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी हे सर्व दमनचक्र आणि दहशत सुरू आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र व शिवसेना इतका कमकुवत नाही. खरी शिवसेना काय आहे हे तुम्ही पाहताय.”

Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
rape at juhu chowpatty marathi news, high court
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…

“लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत”

“लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे. मात्र, महाराष्ट्र-शिवसेना कमकुवत होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ‘संजय राऊत झुकेंगा नही’ आणि शिवसेना पक्षही सोडणार नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मी शिवसेना सोडणार नाही आणि…”, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

“पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय”

यानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाकडे निघाले. मात्र, तेवढ्यात पत्रकारांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी कारवाईवर आनंद व्यक्त केल्याचं सांगत त्यावर प्रश्न विचारला. यावर अचानक मागे वळत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय, पेढे वाटा. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. आनंद व्यक्त करणारे बंडखोर आमदार बेशरम लोक आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे.”