क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“…याला सहकार म्हणत नाही, याला सूड सहकार म्हणतात.”, असं देखील म्हणाले आहेत.

Sanjay Raut PTI
(प्रातिनिधिक छायाचित्र)

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध विषयावर प्रतिक्रिया दिली. सध्या सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण व यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या बरोबरीने चर्चेच्या केंद्रस्थानी असेलेले पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत.या गंभीर आरोपांनंतर क्रांतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित योग्य तो न्याय करण्याची विनंती केली होती. याबाबत देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

“या महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होत नाही. हे महाविकासआघाडीचं सरकार जे आहे, हे शिवरायांच्या विचाराने चालणारं सरकार आहे. राज्यातील जनता जी आहे, सामान्य असो की अन्य कोणी असो विशेषता महिलेवर अन्याय होणार नाही म्हणजे नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. शरद पवारांचं देखील याबाबत मार्गदर्शन असतं. त्या भाजपाच्या नेत्यांना देखील भेटलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारीचा प्रत्येक ठिकाणचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे आला असेल, पण माझं सकाळीच मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेची भूमिका देखील आपल्याला माहिती आहे. मराठी संदर्भात मराठी महिलांसंदर्भात एकुणच सर्वच महिलांबाबत कुणावरही अन्याय होणार नाही. न्याय आणि सत्य या दोन पायावर हे सरकार मजबुतीने उभा आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशाला आदर्श –

याचबरोबर, “महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही देशाला आदर्श असलेली चळवळ आहे. हे पुरोगामी राज्य आहे. संकट काळात विशेषता मागील दोन वर्षांमध्ये करोना, लॉकडाउनमध्ये संपूर्ण जग ठप्प झालेलं असताना, महाराष्ट्रामधील जो मुख्य आर्थिक कणा होता. तो सहकार क्षेत्रावरच टिकून राहिला. ग्रामीण अर्थकारण सहकार क्षेत्रावरच चालत असतं. फक्त ते एखादी संस्था आणि संघटना आमच्या पक्षाच्या ताब्यात नाहीत, म्हणून त्या मोडणं किंवा त्यांच्यामागे चौकशा लावणं. याला सहकार म्हणत नाही, याला सूड सहकार म्हणतात. ” असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“आता सरकारने स्वत:च…”, जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचिट मिळताच फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

तसेच, महाविकासाआघाडी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला क्लीनचिट दिली. त्यामुळे या प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. जलयुक्त शिवार बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मला चारा घोटाळ्याची आठवण झाली, अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये चारा घोटाळा झाल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. महाराष्ट्रात देखील जलयुक्त शिवार संदर्भात अनेक जिल्हे, तालुके व गावांमध्ये ही डबकी तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं? याचा तपास सुरू आहे.” तर, जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचीट मिळाल्यानंतर भाजपाकडून जल्लोष करण्यात आला होता व राज्य सरकारचे दात घशात गेलेत, असं म्हटलं होतं. यावर संजय राऊत म्हणाले की, “आमचे दात मजबूत आहेत. आमच्या बत्तीशीला कुणी चॅलेंज देऊ नका.”

याचबरोबर, आज नवाब मलिक म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात मी इंटरव्हलपर्यंत स्क्रीप्ट लिहिलं आहे, आता पुढंच स्क्रीप्ट संजय राऊत लिहितील किंवा आम्ही दोघेही सलीम-जावेदची जोडी बनून एकत्रपणे काम करू. यावर संजय राऊत यांनी सांगितले की, “आतापर्यंत लिहिलेलं स्क्रीप्ट शोले, दिवार व जंजीर पेक्षा काही कमी नाही. नवाब मलिक जे म्हणाले त्यावर विचार करू.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay rauts reaction on the letter written by kranti redkar to the chief minister msr

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या