मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांना मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने राणे यांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश यांच्या सांगण्यावरून झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याचा नितेश यांच्याशी संबंध असल्याचे अनेक पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले होते. त्यामुळे, नितेश राणे यांना बँकेच्या निवडणुकीपूर्वी भूमिगत व्हावे लागले होते. अखेर तीन आठवड्यानंतर नितेश सगळ्यांसमोर आले होते. तसेच, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसांत प्रत्यर्पण करून नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले होते. त्याआधी प्रत्यर्पण न केल्याने सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे, नितेश यांनी कणकवली न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. त्यानंतर, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर नितेश यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामिनासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने स्वीकारला.

bombay hc expressed displeasure over delay in police action against ashwajit gaikwad
अश्वजित गायकवाड यांच्या विरोधातील हल्ल्याच्या आरोपाचे प्रकरण : तपासातील दिरंगाईवर न्यायालयाचे ताशेरे
Arvind Kejriwal bail stayed
कालचा जामीन आज स्थगित, अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर २४ तासांत विरजण!
Karnataka Emta, officials,
VIDEO : काँग्रेस खासदार धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांकडून मारहाण
Arvind Kejriwal
“…या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही”, केजरीवालांच्या याचिकेप्रकरणी न्यायालयाने ईडीला फटकारलं
juvenile justice board chief magistrate m p pardeshi transfer after period complete pune
बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली
DMK has complained to the Kanniyakumari district collector Against Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याला डीएमकेचा विरोध, काँग्रेस नेते म्हणतात,”ज्यांच्यात विवेक नाही असे..”
Arvind Kejriwal
२ जूनला अरविंद केजरीवाल यांची ‘तुरुंग’वापसी अटळ; अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका नाकारली!
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने बजावले समन्स

हेही वाचा – पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

हेही वाचा – मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी

नितेश यांना मंजूर झालेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठासमोर सरकारच्या या अपिलावर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने नितेश यांना नोटीस बजावून सरकारच्या मागणीवर म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.