पूनम महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच एक दावा केला की प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र होतं. त्यामागे कोण आहे हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र हे षडयंत्र होतं आणि मला त्याची कल्पना आहे असं पूनम महाजन म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता सारंगी महाजन यांनी हा दावा खोडला आहे. पूनम महाजन यांना नैराश्य आलं आहे त्यातून त्या आरोप करत आहेत असा दावा पूनम महाजन यांच्या काकू आणि दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सारंगी महाजन यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात जे घडलं ते फक्त त्या दोघांमध्ये घडलं होतं. प्रवीण महाजन यांनी जे पाऊल उचललं आणि प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यामागे काय घडलं तेही त्यांनाच माहीत होतं. प्रवीण महाजन यांचा स्वभाव तसाच होता. जी घटना घडली त्यात कुठेही षडयंत्र नाही. दोन भावांमधला तो वाद होता. तुम्ही त्याचं रुपांतर कौटुंबिक वादात केलं आहे. तुम्ही म्हणजे कोण? तर पूनम महाजन आणि महाजन कुटुंबाचे सदस्य. हा कौटुंबिक वाद असूच शकत नाही. दोन भावांमध्ये घरातल्या बायकांचा हस्तक्षेप नसायचा. सगळं काही त्या दोघांमध्ये होतं, ते दोघंही बोलत असताना चहा नेऊन देण्याचीही टाप आमच्यात नव्हती. पूनम कधी त्या दोघांमध्ये गेली तर ती काहीतरी ऐकून यायची आणि मग घरातल्या आम्हा बायकांमध्ये त्या त्या वेळी वाद व्हायचे. असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

दोन भावांनी त्यांच्यातल्या वादांची कल्पना कधीही दिली नाही

दोन भावांनी कधीही त्यांच्यात जे काही होतं त्याबद्दल काहीही वाच्यता केली नव्हती. पूनमचं जे म्हणणं आहे की प्रमोद महाजन यांच्या हत्येचं षडयंत्र रचलं गेलं हे तिला म्हणायची गरज का पडली? कोर्टात जाईन हे ती का म्हणते आहे? सत्तेत खासदार असताना तिने हे सगळं का केलं नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे सगळे तिच्याबरोबर होते. पण पूनम आत्ता हे सगळं बोलते आहे कारण तिला तिकिट मिळालं नाही. तिकिट न मिळण्याचं नैराश्य बाहेर येतं आहे. तिच्या मतदारसंघातले बरेच लोक आमच्याकडे आले होते. आम्हाला त्यांनी सांगितलं पूनम बिल्डर लॉबीशीच संपर्कात असते इतरांशी नाही. असाही दावा सारंगी महाजन यांनी केला आहे. आम जनतेशी तिचा संपर्क नाही त्यामुळे तिकिट मिळणार नाही असं लोक म्हणत होते. मला सहा महिने आधी कल्पना आली होती की तिला तिकिट मिळणार नाही. लोक जे सांगायचे ते मी ऐकून घेत होते असंही सारंगी महाजन म्हणाल्या.

हे पण वाचा- Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं-सारंगी महाजन

“प्रवीण महाजन बुद्धिमान होते. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तेव्हा आम्ही भेटायला गेलो होतो. प्रमोद महाजन यांची आठवण काढली नाही असा प्रवीण महाजन यांचा एक दिवस गेला नाही. प्रवीण महाजन यांचं प्रमोद महाजन यांच्यावर विलक्षण प्रेम होतं. पूनम महाजन असं म्हणाली की प्रवीण महाजन यांच्याकडे बंदूक आणि गोळ्या आल्या त्या प्रमोद महाजन यांच्याच पैशांनी आल्या असंही ती म्हणाली. मी तुम्हाला सांगते की गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांना बंदुक घेऊन दिली होती. त्या बंदुकीची किंमत अडीच लाख रुपये होती. प्रज्ञा मुंडे यांनी याचा विरोधही केला होता. मात्र त्यावेळी प्रवीण महाजन यांची बिल्डर्सबरोबर कामं सुरु होती. त्यांच्या जिवाला धोका होता, त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी त्यांना चांगल्या हेतूने बंदूक घेऊन दिली होती. ती बंदूक त्यांच्या कारमध्ये असायची. प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या सहा महिने आधी प्रवीण महाजन यांची चिडचिड वाढली होती, म्हणून ती बंदुक मी लॉकरमध्ये ठेवली होती. आमच्यावर ते खूप चिडचिड करायचे. का चिडचिड करायचे ते सांगायचे नाहीत.” असंही सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे. अनिल गगनभेदी थत्ते या युट्यूब चॅनलला सारंगी महाजन यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत सारंगी महाजन यांनी हा दावा केला आहे.

पूनम माझ्यावर आरोप करते ते साफ चुकीचे आहेत-सारंगी महाजन

पूनम महाजन अप्रत्यक्षपणे गोपीनाथ मुंडेंवर आरोप करते आहे असं मला १०० टक्के वाटतं कारण ती बंदुक प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी घेऊन दिली होती हे पूनमला माहीत आहे, असाही दावा सारंगी महाजन यांनी केला आहे. तसंच पूनम म्हणते की आमच्याकडे पैसे कुठून आले? तर ते माझ्या वडिलांचे पैसे होते, माझ्या नावे काही प्लॉट्स होते ते विकून मी पैसे उभे केले आणि केस लढले आहे. प्रमोद महाजन यांचे पैसे मी केस लढण्यासाठी वापरले हा पूनमचा आरोप साफ चुकीचा आहे असंही सारंगी महाजन म्हणाल्या.

Story img Loader