शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थी व पालक यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ६६६.े२ूीस्र्४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येईल.

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थी व पालक यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ६६६.े२ूीस्र्४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येईल.  गेल्या वर्षीपासून शिष्यवृत्तीचा थेट अंतिम निकाल गुणवत्ता यादीसह जाहीर करण्याची प्रथा परिषदेने मोडीत काढली. त्याऐवजी तात्पुरता निकाल जाहीर केला जातो आहे. अंतिम निकालामध्ये पालक वा विद्यार्थी यांना काही शंका असल्यास पूनर्मुल्यांकन केले जाते. त्यामुळे अंतिम निकालातही बदल होतो. परिणामी गुणवत्ता यादीत आलेली काही मुले यादीतून बाहेर जातात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आधी अंतरिम निकाल जाहीर करून त्यावर पालक-विद्यार्थी यांच्या सूचना मागवायच्या आणि या सूचनांनुसार अंतिम निकाल जाहीर करायचा, अशी पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार हा अंतरिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scholarship result