scorecardresearch

११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक 

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. 

security guard arrested for molesting girl
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : कांदिवली पूर्व येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षारक्षकाला समता नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. पीडित मुलगी खेळण्यासाठी इमारतीच्या खाली गेली असता आरोपीने तिला असभ्यरीत्या स्पर्श केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. 

११ वर्षीय पीडित मुलगी कांदिवली पूर्व येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहते. शनिवारी पीडित मुलगी इमारतीतील उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी उदवाहनातून बाहेर पडताना आरोपीने तिचा हात पकडला. तसेच तिला असभ्यरीत्या स्पर्श केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 02:38 IST