scorecardresearch

Premium

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला.

Police Constable Arrested
ड्रग्ज तस्करी करणारा हवालदार अटकेत (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईः मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला. लहान मुलगी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान

26 year old woman committed suicide in pune
पुणे : सिंहगड रस्ता भागात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पती गेल्या काही महिन्यांपासून छळ करत होता
SEBI listed SME companies short-term ASM TFT unrestricted boom SME IPOs
‘एसएमई आयपीओ’तील अनिर्बंध तेजीने चिंता वाढवली; गत १० वर्षात तब्बल १०,३५० टक्के परतावा
traders plot of 1000 sqft rehabilitation project onion potato market apmc vashi
कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड
pune seized drugs worth rupees 5 crores burnt by police
पुण्यात जप्त केलेल्या पाच कोटींच्या अमली पदार्थांची होळी

हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू

याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी राहत्या इमारतीच्या खाली सोमवारी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत होती. त्यावेळी तिला शौचालयात जायचे असल्यामुळे तिने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला महिलांच्या शौचालयाबाबत विचारणा केली. महिलांचे शौचालय बंद असून आरोपीने पीडित मुलीला पुरुषांच्या शौचालयात जाण्यास सांगितले. तेथून आल्यानंतर मुलीने पाण्याची मागणी केली असता आरोपीने मसाज रूममध्ये नेऊन पाणी देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार कुटुंबियांना याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Security guard arrested for molesting minor girl in malad mumbai print news ssb

First published on: 03-10-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×