ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात

७७ वर्षीय सायरा बानो यांची प्रकृती सुधारत आहे

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना रक्तदाबाशी संबंधित समस्येमुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सायरा बानो यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ७७ वर्षीय सायरा बानो यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्या करोनाबाधित नाहीत, मात्र करोनाच्या नियमांनुसार त्यांना स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Senior actress saira banu in hospital akp