scorecardresearch

ज्येष्ठ चित्रपट वितरक राहुल हक्सर यांचे निधन

मुंबईतील चित्रपट वितरक वर्तुळातील अनुभवी आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून राहुल यांची ओळख होती.

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट प्रदर्शक आणि वितरक राहुल हक्सर यांचे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास मेंदू विकाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.  मुंबईतील चित्रपट वितरण व्यवसायातील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल यांना महिन्याभरापूर्वीच मेंदू विकाराचे निदान झाले होते. त्यांचा आजार गंभीर असल्याची कल्पना डॉक्टरांनी त्यांना दिली होती. अखेर आज सकाळी हक्सर यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली. मुंबईतील चित्रपट वितरक वर्तुळातील अनुभवी आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून राहुल यांची ओळख होती. गेली २६ वर्ष राहुल हक्सर हे डॉ. सुनील पाटील यांच्याबरोबर चित्रपट प्रदर्शन आणि वितरण व्यवसायात होते. त्यांच्या व्ही. एन. डिस्ट्रिब्युटर्स आणि रजत एंटरप्राईजेस या बॅनरअंतर्गत १६० सिनेमागृहांमधून चित्रपट वितरण आणि प्रदर्शन करण्याचे हक्क त्यांच्याजवळ होते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे वितरण हक्सर यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior film distributor rahul haksar passes away zws

ताज्या बातम्या