ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्रासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे.
‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्रांमधील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. ‘नवभारत’मधून पत्रकारिता क्षेत्रातील कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर तब्बल १२ वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक होते. या काळात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लिहिलेले लेख लोकप्रिय ठरले होते. गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून तब्बल २८ वर्षे काम केले. याशिवाय, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’, ‘द हिंदू’, ‘द डेक्कन हेरॉल्ड’, ‘रॅडिकल ह्युमनिस्ट’, ‘फ्रंटलाइन’ अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी स्तंभलेखन केले होते. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी. गोएंका. दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. पत्रकारितेतील तळवलकर यांच्या लिखाणामुळे महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्यांचे बौद्धिक पोषण झाले. त्यांचे लिखाण राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबरच समाजाला दिशा देणारे होते.
शेक्सपिअर.. जगाचा नागरिक (पूर्वार्ध)
शेक्सपिअर.. आंतरिक नाते (उत्तरार्ध)
गोविंद तळवलकर यांचं प्रकाशित साहित्य
अग्निकांड :- “युद्धाच्या छायेत” ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा
अफगाणिस्तान
नौरोजी ते नेहरू (१९६९)
बाळ गंगाधर टिळक (१९७०)
वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १ आणि २) (अनुक्रमे १९७९ आणि १९९२)
परिक्रमा (१९८७)
अभिजात (१९९०)
बदलता युरोप (१९९१)
अक्षय (१९९५)
ग्रंथ सांगाती (१९९२)
डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
नेक नामदार गोखले
पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)
प्रासंगिक
बहार
मंथन
शेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी २०१६)
सत्तांतर (खंड १-१९७७ , 2-१९८३, व ३-१९९७)
सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ आणि २)