मुंबई : सप्टेंबर महिना आजवरचा उष्ण महिना ठरला आहे. सप्टेंबरमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरी तापमानापेक्षा १.२४ अंश सेल्सिअसने जास्त होते. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर इन्व्हारमेंटल इंन्फॉर्मेशनने (एनसीईआय) २०२४ हे आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या नॅशनल ओशोनिक अॅण्ड अॅटमॉस्पेअरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (एनओएए) दिलेल्या माहितीनुसार, १९९१ ते २०२० या काळातील सप्टेंबर महिन्यातील हवामान विषयक नोंदीची सरासरी पहाता, यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरी तापमानापेक्षा १.२४ अंश सेल्सिअसने जास्त होते. सप्टेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी १५ अंश सेल्सिअस असते. गेल्या वर्षाचा सप्टेंबरही सरासरीपेक्षा ०.१९ अंश सेल्सिअसने उष्ण ठरला होता. अमेरिकेतही १३० वर्षांच्या इतिहासात यंदाचा सप्टेंबर महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा (३.९ फेरनहाईट) जास्त होते.

हेही वाचा…राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…

u

सप्टेंबरमध्ये अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सर्वात कमी म्हणजे ६.५९ दशलक्ष चौरस मैल होता. उत्तर गोलार्धातील बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा थोडे कमी होते. उत्तर अमेरिकेवरील बर्फाच्छादित प्रदेश सरासरीपेक्षा कमी म्हणजे ३,२०,००० चौरस मैल होते. युरेशियामध्ये बर्फाच्छादित प्रदेश सरासरीपेक्षा किंचित जास्त, ९०,००० चौरस मैल होता.

हेही वाचा…सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…

सप्टेंबरमध्ये जागतिक पर्जन्यवृष्टी दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास होती. प्रामुख्याने सहारा वाळवंटात सप्टेंबर महिना आजवरचा सर्वात ओला सप्टेंबर ठरला आगे. ७, ८ सप्टेंबर रोजी अति उष्णकटिबंधीय चक्री अंशाने तर किमान तापमान ०.९९ अशांने जास्त राहिले आहे. तमिळनाडूमधील मधुराई येथे १७ सप्टेंबर रोजी ४१.० अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.

Story img Loader