केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील,” असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला. ते शनिवारी (७ जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे.”

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
ajit pawar and yugendra pawar and sharad pawar
‘अजित पवारांचं बंड कुटुंबातील सर्वांनाच आवडलेलं नाही,’ युगेंद्र पवारांचं विधान; म्हणाले, “कुटुंबात…”
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका

“…तेव्हा उद्धव आणि रश्मी ठाकरे राऊतांना चपलाने मारतील”

“तेव्हा संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा,” असं नारायण राणे यांनी म्हटलं.

“राऊत ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळतो”

“राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा.असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका,” असंही राणेंनी नमूद केलं.

“रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम”

नारायण राणे म्हणाले, “राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे. अशावेळी माध्यमं संजय राऊतांविषयी बोलत आहेत. मात्र, रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम आहे.”

हेही वाचा : “अजित पवारांनी फार समर्पक उपमा दिली आहे; प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…” राणेंवर टीका करताना संजय राऊतांचा टोला!

“माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती”

“मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही,” असं म्हणत राणेंनी राऊतांना टोला लगावला.