आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्या यांच्या वकील पावनी चड्डा यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज होता. पूर्ण २ तास सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. आता आम्ही यावर उच्च न्यायालयात आव्हान देऊ.”

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

“न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की गोळा केलेले ११ हजार रुपये संबंधितांकडे जमा आलेले नाहीत. ते पैसे दिल्याचे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात यावर स्पष्टीकरण देऊ. आम्ही काही दिलासा देण्याची विनंती केली होती मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळली आहे. आज किरीट सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल देण्यात आला, उद्या नील सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल येईल,” असंही पावनी चड्डा यांनी नमूद केलं.

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात सकाळी युक्तीवाद झाला. सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली होती तीच आम्ही विशेष करून दाखवली. कारण त्यांनी त्या कागदपत्रांमधून तो गुन्हा जवळजवळ कबुलच केला होता. तसेच फोटोग्राफ देखील लावले होते. त्यामुळे आमचा युक्तीवाद तोच झाला. मला नुकतंच सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं समजलं. निकाल हातात आल्यावर त्यावर अधिक बोलेल.”

“एका पैशाची केली तरी ती चोरीच आणि कोट्यावधी रुपयांची केली तरी ती चोरीच. त्यामुळे चोरी ही चोरीच असते. ही चोरी किरीट सोमय्या यांनी मान्य केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल,” असंही प्रदीप घरत यांनी नमूद केलं.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. विक्रांत या युद्धनौकेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.

चर्चगेट येथे २०१३ मध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते विक्रांत वाचवा असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून युद्धनौका विक्रांत संग्रहालय असे लिहिलेल्या पेटय़ांमधून चर्चगेट स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले  यांनी त्या वेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले. पुढे  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकणार असल्याचे त्यांना समजले. जानेवारी २०१४ मध्ये  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकण्यात आले. सर्व भाग अंदाजे ६० कोटी रुपयांना विकण्यात आले, तसेच ते सर्व भाग आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑनलाइन लिलावाद्वारे विकत घेतल्याची माहिती  भोसले यांना वर्तमानपत्राद्वारे समजली.

दरम्यान, धिरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार  भोसले ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.