मुंबई : प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या या आणि त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. त्या वेळीच राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही आरोप असल्याने नंतर त्यांनी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील जामीन अर्ज मागे घेऊन जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

सत्र न्यायालयानेही त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. 

घरचे जेवण देण्याची राणा दाम्पत्याची मागणी

मुंबई : प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या या आणि त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. त्या वेळीच राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही आरोप असल्याने नंतर त्यांनी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील जामीन अर्ज मागे घेऊन जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयानेही त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देऊन त्यावरील सुनावणी २९ एप्रिलला ठेवली होती. वेळ उपलब्ध असल्यास सुनावणी घेतली जाण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.