मुंबईत महिला ड्रग्ज पेडलरला अटक; सात किलो हेरॉईन जप्त

मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहिम चालवली जात आहे.

DRUGS
(प्रातिनिधीक छायाचित्र)

मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सप्लायर्सच्या विरोधात एक विशेष मोहिम चालवली जात आहे. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज पुरवणाऱ्या लोकांवर नजर ठेवली जात आहे. नुकतंच एका महिलेकडून सात किलो हेरॅाईन जप्त केलं गेलं असून संबंधित महिला ही मुंबईतील टॅाप ड्रग्ज पेडलर्सपैकी एक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

मुंबई शहरात ड्रग्ज पुरवणाऱ्या लोकांचं मोठ रॅकेट समोर आलं आहे. अटक करण्यात आलेली महिला ही गेल्या १० वर्षांपासून या धंद्यात आहे, असेही दत्ता नलावडे यांनी सांगितले. आत्तापर्यंत ड्रग्जची ८ नविन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये एकूण १६ किलो हेरॅाईन जप्त केले गेले आहेत. त्यापैकी तीन जणांना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत २१ कोटी रूपये आहे, असंही नलावडे म्हणाले.

राजस्थान ते मुंबई अशी एक सप्लाय चेन..

“ह्युमन कुरिअर्सचा वापर करत मुंबईत ड्रग्जचा प्रवास होत आहे. राजस्थान ते मुंबई अशी एक ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांची साखळी असून या तपासात आम्हाला यातील काही जणांची नावे कळाली आहेत. ज्यांची नाव आम्ही लवकरच उघड करू. क्राईम ब्रांचच्या युनिट ७ ने सेक्स टुरिझमचा भंडाफोड केला असुन दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे,” असंही दत्ता नलावडे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seven kg heroin seized from female drug peddler in mumbai hrc

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या