गेल्या चार वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सात शिक्षकांना विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आले असून १७९ शिक्षकांविरुद्ध विविध स्वरुपाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सुमारे ८७ शिक्षकांपैकी काहींवर दंडात्मक कारवाई, तर काहींची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सुमारे ९२ शिक्षकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. ज्ञानदानात कुचराई केल्याबद्दल शिक्षकांवर निरनिराळ्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- “स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी…”, सीमाप्रश्नावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक तयार करणाऱ्या शिक्षकांना मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने उत्तीर्ण-अनुत्तीर्ण असल्याचा शेरा देण्यात आला आहे. प्रजा फाऊंडेशने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सध्यस्थितीबाबतचा अहवाल जाहीर केला असून शिक्षकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या माहितीचा त्यात आढावा घेण्यात आला आहे.

शिक्षण विभागाने २०१७ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात येते. शाळा, वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आधारे शिक्षकांचेही मूल्यमापन करण्यात येत असून उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरवही करण्यात येतो, तर कामचुकार शिक्षकांची चौकशी, समज देणे, नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई, निलंबन अशा स्वरुपाची कारवाई करण्यात येते. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. प्रजा फाऊंडेशनने माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून मिळवलेल्या माहितीच्या आधाराने तयार केलेला अहवाल जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येत असून ज्ञानदानात कुचराई करणाऱ्या शिक्षकांची चौकशी केल्यानंतर दोषारोप ठेऊन कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा– Fifa World Cup 2022 : स्वयंसेवकांच्या फौजेत नवी मुंबईतील तरूण

दोषी शिक्षकांची संख्या घटली

शिक्षण विभागाने २०१२ ते २०१८ या कालावधीत निरनिराळ्या कारणांमुळे ७३ शिक्षकांची चौकशी केली होती. तर ४४ शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून आढळून आले आहे. गेल्या चार वर्षात चांगल्या गुणवत्तेमुळे २०४ शिक्षकांना गौरवण्यात आले होते. तर १७९ शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात आली होती. सुमारे ८७ शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर ९२ शिक्षकांवर नोटीसा बजावण्यात आली होती. ६० शिक्षकांची चौकशी करण्यात आली आणि ७ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा- मुंबई: तीन वर्षात मुंबई रेल्वे हद्दीत १६८ जणांनी केली आत्महत्या


या संस्थेने ही माहिती कशाच्या आधारे मिळवली, ती खरी आहे का, याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे. शिक्षकांना शिस्त लावणे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येत आहे. मूल्यमापनात काढण्यात येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे संबंधित शिक्षकाला शिक्षा केली जाते. शाळांचे पर्यवेक्षण करताना आढळणाऱ्या काही त्रुटी, एखाद्या शिक्षकाविरोधात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी केली जाते, मुख्याध्यापक अन्य शिक्षक यांचे जबाब घेतले जातात. त्यात शिक्षक दोषी आढळल्यास शिक्षा करण्यात येते. लेखी समज देणे, १००, ५०० ते हजार रुपये दंड करणे, वेतनवाढ रोखणे, कायमस्वरुपी वेतनवाढ रोखणे अशा स्वरुपाची कारवाई करण्यात येते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणअधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.