मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी कोर्टाने पोलिसांना जामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान २७ डिसेंबरपर्यंत पुढील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाने बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याच्या आरोपातून दोषमुक्त करण्याची नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांची मागणी बुधवारी फेटाळली. कनिष्ठ न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर त्याविरोधात राणा आणि त्यांच्या वडिलांनी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुलुंड येथील महानगरदंडाधिकाऱ्याने बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्याची मागणीही राणा आणि त्यांच्या वडिलांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. ती मागणीही विशेष न्यायालयाने फेटाळली.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

नवनीत राणांना कोर्टाचा दणका, अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार; अडचणी वाढण्याची शक्यता

राणा आणि त्यांच्या वडिलांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवले हे दर्शवणारे पुरेसे पुरावे आहेत असे मत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिलासा नाकारताना नोंदवले. साक्षीदारांच्या जबाबासह कागदपत्रे पाहिली तर राणा आणि त्यांच्या वडिलांनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते असे मतही नोंदवले.

राणा या ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र शाळा सोडल्याच्या खोटय़ा दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.