Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे? असं विचारत उपस्थित प्रेक्षकांना शरद पवारांचं नाव मोठ्या घेण्यासही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. यावेळी शहाजीबापू पाटील आपल्या भाषणात म्हणाले, “गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो. तरीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसरा मेळाव्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुहृदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले? शरद पवार… मोठ्याने नाव घ्या घाबरू नका. बारामतीचा म्हमद्या कोणाला म्हणाले? शरद पवार… दाऊदचा हस्तक कोणाला म्हणाले? शरद पवार… ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुहृदयसम्राट म्हणाले” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा, पाहा LIVE

दरम्यान, शहाजीबापू पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीकास्र सोडलं आहे. माझ्या मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन हे बघून जा म्हणावं. मग खरी शिवसेना कुठली हे कळेल, असं विधान केलं आहे.

मेलेल्या कुत्र्यासारखं फरफटत नेलं- शहाजीबापू पाटील
एखाद्या मेलेल्या कुत्र्याला फरफटत नेऊन उकिरड्यावर टाकतात, तसं तुम्ही सगळ्या आमदारांना फरफटत नेलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर आम्हाला फेकून दिलं. हे उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप आहे. ते पाप खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंनी धुतलं. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केलेली नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी धाडसाने उचलेलं एक पाऊल आहे. हे पाऊल महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नसतं, तर महाराष्ट्रात ४०-४५ मेळावे झाले नसते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahaji bapu patil on ncp sharad pawar in dasara melava rmm
First published on: 05-10-2022 at 19:31 IST