Shambhuraj Desai minister Thane Fadnavis has the responsibility Vidarbha ysh 95 | Loksatta

ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी

दीपक केसरकर हे मुंबई शहर जिल्ह्याचे, तर मंगलप्रभात लोढा हे  उपनगर जिल्ह्याचे, तर शंभूराजे देसाई हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.

ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी
ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दीपक केसरकर हे मुंबई शहर जिल्ह्याचे, तर मंगलप्रभात लोढा हे  उपनगर जिल्ह्याचे, तर शंभूराजे देसाई हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर लोढांकडे मुंबई उपनगरची धुरा; विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे

मुख्यमंत्री शिंदे सरकारचा विस्तार होऊन दीड महिना उलटला, तरी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गेले तीन महिने जिल्हा नियोजन समित्यांचे कामकाज ठप्प होते आणि विकासकामे अडली होती. त्यामुळे अखेर भाजप व शिंदे गटामध्ये पालकमंत्रीपदांचे वाटप होऊन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्र्यांकडील जिल्ह्यांची संख्या कमी केली जाईल.

हेही वाचा >>> भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

नवीन पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  • दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर.
  • अतुल सावे- जालना, बीड. 
  • शंभुराज देसाई- सातारा, ठाणे.
  •   मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर.
  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर.
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया.
  • चंद्रकांत दादा पाटील- पुणे.
  • विजयकुमार गावित- नंदुरबार.
  • गिरीश महाजन-धुळे, लातूर, नांदेड.
  • गुलाबराव पाटील- बुलढाणा, जळगाव. 
  • दादा भुसे- नाशिक.
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम.
  • सुरेश खाडे- सांगली. 
  • संदिपान भुमरे- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर).
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड.
  • तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव).
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग.
  • अब्दुल सत्तार- हिंगोली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबईकरांचे सवलतीत घरखरेदीचे स्वप्न साकार; संदीप रुणवाल यांचा विश्वास

संबंधित बातम्या

धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
प्रथम वर्ष पदवीचे वेळापत्रक कोलमडणार
Bhagwangad: पंकजा मुंडेंनी घेतले भगवानबाबांचे दर्शन, नामदेव शास्त्रींची भेट टाळली
फ्लेचर पटेल कोण आहे? समीर वानखेडेंचा त्यांच्याशी काय संबंध?; नवाब मलिकांच्या नव्या आरोपामुळे खळबळ
मुंबईमधील जोडपं Live Stream करत होतं Sex Video; गायकाच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुण्यातील मनसेने कर्नाटकच्या गाड्यांना फासले काळे; जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून नोंदविला निषेध
“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…
‘फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवी नगरपालिका’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
“कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्र…”, सीमावादावरून सुषमा अंधारे आक्रमक, भाजपावर गंभीर आरोप
Himachal Pradesh Election 2022 : अपक्ष उमदेवार ठरणार ‘किंगमेकर’?, भाजपा-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी अटीतटीची लढाई!