scorecardresearch

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? शंभूराज देसाई म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल, शिवसेना…”

desai
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? शंभूराज देसाई म्हणाले, "आमच्या…"

शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात २०१९ साली मुख्यमंत्रीपदावरून दुरावा आला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण राज्यात उदयाला आलं. त्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साथीने शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी बंड केलं. हे सर्व विसरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज ( २३ मार्च ) एकत्र आले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सतराव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रच प्रवेश केला. सत्तापालट झाल्यावर ठाकरे-फडणवीस एकमेकांना भेटलं, गप्पा मारल्या. यानंतर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : शिवसेना संसदीय नेतेपदावरून हटवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी…”

टीव्ही ९ मराठीशी बोलताना शंभूराज देसाई यांनी म्हटलं, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटलं असतं. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल, शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. तर, तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम करा, असं फडणवीसांनी म्हटल्याची चर्चा आहे.”

हेही वाचा :

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात चलबिचल आहे, असं महाविकास आघाडीचं नेते म्हणतात, याबद्दल विचारलं असता शंभूराज देसाईंनी सांगितलं, “आमच्या लोकांतील चालण्यात, बोलण्यात कुठं जाणवतं का? आम्ही नेहमीप्रमाणे अधिवेशनाचं आणि दिलेल्या विभागाचं काम करत आहे. चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षात नाही. उलट सरकार पडेल म्हणून महाविकास आघाडी तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलं नाही. कारण, फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे.”

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:32 IST

संबंधित बातम्या