मुंबई : वाचकांसाठी नवीन सोयी-सुविधा, नव्या उपक्रमांचे आयोजन, तसेच अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी आणि तरुण वर्ग जोडला जाईल, अशा मार्गदर्शनपर सूचना ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’चे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या. ग्रंथसंग्रहालयाची नवीन कार्यकारिणी, विश्वस्त व उपाध्यक्ष यांची संयुक्त बैठक मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ येथे झाली.

बैठकीत कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच या वेळी पवार यांनी ग्रंथसंग्रहालयासमोरील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे वाचकांचा ओघ वाढवता कसा येईल यासंदर्भात चर्चा झाली. उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, शशी प्रभू, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर तसेच विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, प्रताप आसबे, अरिवद तांबोळी आणि संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
five different political parties application to mumbai municipal corporation for shivaji park ground
‘शिवाजी पार्क’वर सभांचा धुरळा; मैदानासाठी पाच पक्षांचे महापालिकेकडे अर्ज

संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी आगामी काळात ग्रंथालय सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे उपक्रम घेण्याबाबतच मार्गदर्शन केले. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठी भाषा व ग्रंथालय संवर्धनासाठी आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचे असून त्यासाठी सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते, अशी भूमिका मांडली.

 मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव व मराठी संशोधन मंडळाचा अमृत महोत्सव साजरा करताना निरनिराळ्या उपक्रमांबद्दल कसा विचार करता येईल याबाबत संदर्भ विभाग कार्यवाह उमा नाबर यांनी माहिती दिली.

प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी  संस्थेच्या सर्वंकष विकासासाठी करता येणाऱ्या कामाची, उपक्रमाची माहिती दिली.  आगामी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय महाराष्ट्रातील मराठी भाषिक अभ्यासक व वाचकांचे महत्त्वाचे केंद्र व्हावे यासाठी सर्वतोपरी नियोजनबद्ध काम कार्यकारिणी करेल अशी हमी कार्याध्यक्ष शीतल करदेकर व रवींद्र गावडे  यांनी मान्यवरांना दिला.