मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार

शरद पवार गेली ४० वर्षे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत, तर उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते.

sharad-pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी पवार यांना २९ मते मिळाली, तर ‘आप’चे धनंजय शिंदे यांना दोन मते मिळाली, तर तीन जण गैरहजर होते.शरद पवार गेली ४० वर्षे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी आहेत, तर उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. माजी आमदार विद्या चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर, शशी प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून किरण सोनवणे यांनी काम पाहिले.

कार्यकारिणी सदस्य

जयवंत गोलतकर, सुरेंद्र करंबे, उदय सावंत, रवींद्र गावडे, सुनील राणे, विनायक परब, प्रदीप ओगले, हेमंत जोशी, मनीष मेस्त्री, शीतल करदेकर, मारुती नांदविस्कर, उमा नाबर, सूर्यकांत गायकवाड, शिल्पा पितळे, स्वप्निल लाखवडे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar elected president of mumbai marathi granth sangrahalaya zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या