scorecardresearch

जनुकीय सुधारित संशोधनाला परवानगी मिळाल्यास देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण ; शरद पवार

देशाचा कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर माझ्याकडे पहिलीच फाइल अन्नधान्य आयात करण्यासंदर्भातील आली होती.

जनुकीय सुधारित संशोधनाला परवानगी मिळाल्यास देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण ; शरद पवार
शरद पवार ( गणेश शिरसेकर इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

मुंबई : देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी खाद्यतेलाची आपणास आयात करावी लागते. अलीकडील काळात मोहरी या तेलबियांवर जनुकीय सुधारित (जीएम) संशोधन झाले आहे. या जीएम संशोधनास सरकारने परवानगी दिली तर आपणास खाद्यतेलाची आयात करावी लागणार नाही. देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या शिक्षण, कृषी, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासवृत्तीचे वितरण शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत झाले.  देशाचा कृषीमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर माझ्याकडे पहिलीच फाइल अन्नधान्य आयात करण्यासंदर्भातील आली होती. देशातील गोदामामधील धान्यसाठय़ाची खातरजमा करून मला त्यावर नाइलाजाने स्वाक्षरी करावी लागली. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण  झालो. मात्र अजूनही आपणांस खाद्यतेलाची आयात करावी  लागते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली पाहिजे.या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राने अभ्यासवृत्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कृषी क्षेत्रांतील संशोधनासाठी ८०,  साहित्य १२ आणि शिक्षण ४० अशा एकूण १३२ अभ्यासवृत्तीचे वितरण करण्यात आले. कृषी संशोधक डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते. ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ डिसेंबर २०२१ वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 05:38 IST

संबंधित बातम्या