मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतात, अशा कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कमपणे काम करत आहे. ज्याला कोणाला यायचं आहे, त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणाच्या सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

दुष्काळ, एमपीएससीतील घोटाळा, एसआयआर प्रक्रियेतील वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्य कार्यकारणीची बैठक झाली. या कार्यकारणीच्या बैठकीत प्रामुख्याने दुष्काळ आणि पक्ष संघटनेवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बाबत अनेक चर्चा माध्यमांमध्ये रंगतात असतात, अशा कोणत्याही चर्चेला काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने राज्यभरात काम करत आहे, त्यामुळे आमच्या बाबत कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका. ज्याला कुणाला यायचं आहे, त्यांनी आमच्या यावे, आम्ही कुठेही जाणार नाही, असा इशाराच पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला.प्रसारमाध्यमातून सतत शरद पवार गट अजित पवार गटामध्ये किंवा काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा रंगत असते, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिलेला इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, या दुष्काळाच्या स्थितीविषयी राज्य सरकारने एक शासन निर्णय काढला आहे, त्यात अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर कराव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांना कालच पुन्हा पत्र पाठवले आहे. मला अपेक्षा आहे की, या पत्राचा विचार करून सरकार तातडीने अंमलबजावणी करेल. राज्यातील दुष्काळग्रस्त लोकांना मदतीचा हात देईल. आम्हाला रस्त्यावरून करून आंदोलन करायचे नाही. सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदत मिळवायची आहे मदत नाही मिळाली तर, आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा आहे त्यांनी सरकारला दिला.

कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घ्या

सध्याचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घ्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण हवे असेल तर मोफत प्रशिक्षण दिले जाईल, त्याची सोय बारामती येथे केले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ते शिवाय येणारा काळ अडचणीचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर राजकारण, निवडणूक आणि पक्ष बांधण्यासाठी कसा करता येईल याचाही अभ्यास करा, असे आवाहनही पवार यांनी केले.

राज्य कार्यकारिणीच्या बैठक ला खासदार आमदार जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी शरद पवार यांनी लोकप्रतिनिधींशी सिल्वर ओक येथे संवाद साधला होता बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना १७ मागण्यांचे पत्र पाठवले होते.