पंतप्रधान होण्याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधी प्रशासकीय अनुभव घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यावर ‘निवडणुकीनंतर पवार आपले मत बदलतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे,’ अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसने शनिवारी व्यक्त केली आहे.
पवार यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे मत व्यक्त केले होते. पवारांचे मत निवडणुकीनंतर बदलेल. सोनिया गांधी यांच्या बाबतचे मतही असेच बदलले होते, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.