हिना खंडेलवाल
माटुंगा हा दाक्षिणात्य खाद्यपदार्थ प्रेमींसाठी बालेकिल्ला. याच परिसरात शारदा भवन आणि अंबा भवन ही दोन हॉटेलं आहेत. जवळपास एक शतक दोन कुटुंबांनी या हॉटेलच्या निमित्ताने एक अनोखी खाद्यपरंपरा जपली आहे.

मध्य रेल्वेवरच्या माटुंगा स्टेशनातून तुम्ही बाहेर पडा आणि तीन मिनिटं चाललात की तुम्हाला शारदा भवन अशी पाटी दिसेल. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून तुम्ही एका जुन्या शिसवी काळात गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. आर्ट डेको पद्धतीच्या या इमारतीत तळमजल्याला शारदा भवन आहे. सकाळी ७ वाजताच ते उघडतं. दादरला माटुंग्याशी जोडणाऱ्या या रस्त्यावरून तुम्ही गेलात तर शारदा भवनमधून वाफाळत्या सांबाराचा वास तुमच्या नाकात दरवळेल. तुम्ही कधीही गेलात तर तरुण मंडळी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, महिला असे सगळे इथे आनंदाने खात असतात. परीक्षा, गॅसचे वाढते दर, पाणीटंचाई, राजकारण यावर तळमळीने बोलताना ते इडली, उपमा, डोसा यांचा आस्वाद घेत असतात. सांबार भुरकत असतात.

जुन्या पद्धतीच्या या इमारतीला मोठ्या खिडक्या आहेत. या खिडक्यांना मेटल ग्रिल बसवलेली आहेत. त्यातून सूर्यकिरणं आणि वारा दोन्ही खेळता राहतो. खुर्च्या एकदमच खास अशा. पोलंडहून मागवलेल्या. डझन ६० रुपये. जुन्या काळात इराणी, पारसी असो किंवा आपलं हॉटेल- सगळीकडे याच खुर्च्या तुम्हाला दिसतील असं गणेश राव सांगतात. गणेश साठीतले गृहस्थ आहेत जे भाऊ सुंदर राव यांच्या बरोबरीने ९० वर्षांची ही खाद्यपरंपरेची मशाल पुढे नेत आहेत.

या खुर्च्या विकणारा त्या लांब फेकून देऊन दाखवत असे. त्या किती टिकाऊ आहेत हे सिद्ध करण्यासाठी. गणेश हसून ती आठवत सांगतात. राव कुटुंबीयांनी या खुर्च्या जपल्या आहेत मात्र आता त्यांच्या दुरुस्तीचं काम निघालं तर माणूस मिळत नाही ही त्यांची खंत आहे.

शारदा भवन तुम्हाला वेगळ्याच काळात नेतं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आंबा भवनला भेट द्यायला हवी. मुंबईकरांची जिव्हा तृप्त करणारी ही दोन केंद्रं. दोन कुटुंबीयांनी अडथळ्यांच्या शर्यती पार करत निगुतीने ही परंपरा जोपासली आहे. जवळपास शतकभर हा खाद्य खटाटोप अविरत सुरू आहे.

१९२०च्या बेतात राघवेंद्र राव आणि शंकरनारायण राव कर्नाटकातल्या उडुपी इथून मुंबईत आले. मुंबईत स्थिरस्थावर होईस्तोवर गाठीशी असलेले पैसे चोरीला गेले. एका दाक्षिणात्य कुटुंबाला त्यांच्या हॉटेलसाठी आचाऱ्याची आवश्यकता होती. त्या कुटुंबाने राव मंडळींना काम दिलं आणि पर्यायाने आधारच दिला. राघवेंद्र आणि शंकरनारायण यांनी अनेक वर्ष ते काम केलं. मालकांनी ते दुकान विक्रीस काढणार कळल्यावर या दोघांनी ते विकत घेतलं. त्याचं नाव ठेवलं- अंबा भवन कॉफी हाऊस. त्यांनी मूळ रचनेत थोडा बदल करून पोटमाळा काढला. बर्मा लाकडाच्या साह्याने त्यांनी हा पोटमाळा सज्ज केला.

१९३०चा काळ होता. ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हा हॉटेलांना अशीच नावं असत असं श्रीपती राव सांगतात. श्रीपती हे राघवेंद्र यांचे चिरंजीव. ते आता भाऊ श्रीधरच्या बरोबरीने हॉटेलचा कारभार चालवतात. काही वर्षांनंतर म्हणजे १९३६-३७च्या बेतात त्यांच्या सहकाऱ्यांनी माटुंगा स्टेशनजवळ आर्ट डेको धाटणीच्या इमारतीत शारदा भवन सुरू केलं. खाली हॉटेल आणि वरती राहायची व्यवस्था देणारं लॉज अशी रचना होती. मेनू साधा होता- इडली, वडा, उपमा आणि डोसा. जवळपास शतकभरानंतरही या दोन्ही ठिकाणी खवैय्यांची रीघ लागते. वाफाळत्या सांबाराबरोबर मऊसूत इडली आणि खमंग मेदूवडा खायला गर्दी असते. कालौघात मुंबई बदलली पण या दोन हॉटेलांचे निष्ठावान ग्राहक कायम राहिले.

इडली, वडा आणि डोसा हे अंबा भवनचं सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य. हॉटेल परिसरात अनेक मंदिरं असल्यामुळे भाविक दर्शन आटोपलं की इथे हजर होतात. अंबा भवनमध्ये दररोज गोडाचा वेगवेगळा पदार्थ तयार होतो. सोमवारी मोहनपुरी असते, शुक्रवारी पानपोळी तर शनिवारी इमरती. आंबा भवनमध्ये पदार्थ बनवून ठेवले जात नाहीत. उदाहरणार्थ उपमा सहा सात प्लेटच तयार केला जातो. जशी ऑर्डर येईल तसं बनवला जातो. चहाकॉफी नवी केली जाते. ग्राहकाने वडा मागितला की तळला जातो.

शारदा भवनचा मेन्यू विस्तारत गेला. आता तिथे कोरिएंडर डोसा मिळतो. उलूंडू डोसा मिळतो. कढीवडाही असतो आणि मंगलोर बनही मिळतात. उडुपी ब्राह्मण पद्धतीचं सांबार रटरटत असतं. ते गोडूस नसतं. मसाला डोसा सोडला तर बाकी बहुतांश पदार्थ जैन मंडळीही खाऊ शकतात. कारण आमच्या ग्राहकांमध्ये गुजराती लोक जास्त आहेत असं गणेश राव सांगतात.

अनेक दशकं वरच्या मजल्यावर थाळी मिळत असे. दुपारी अनेकांच्या जेवणाचं ते हक्काचं ठिकाण होतं. आणीबाणीच्या काळात ही पद्धत बंद पडली. त्यानंतर थाळी विषय बंद झाला. हॉटेलच्या वेळाही बदलल्या. जुन्या काळी हॉटेल सकाळी ५.१५ला हॉटेल उघडत असे आणि रात्री ८.३०ला बंद होतं असे. आता सकाळी ७ ते रात्री ८ अशी वेळ आहे. दुपारी तीन तास विश्रांतीचे असतात.

आजही पदार्थांचा ताजेपणा ठसठशीतपणे जाणवतो. शारदा भवनमध्ये इडलीचं पीठ दिवसातून दोनदा तयार केलं जातं. सांबार मसाला रोज तयार केला जातो. संध्याकाळी साडेसहानंतर पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया कमी होत जाते. जे सांबार आणि चटणी शिल्लक असतं ते आसपासची मंडळी घेऊन जातात. इडलीचं पीठ घरी नेऊन त्याबरोबर हे सांबार चटणी फस्त होते. कालचं काहीच उद्याला वापरलं जात नाही.

अगदी गेल्या महिन्यापर्यंत शारदा भवनमध्ये ६५ रुपयांना इडली प्लेट मिळत होती. आता महागाईमुळे ७० रुपये झाली आहे. ‘गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. भाववाढ केली तरी परिसरातल्या परवडणाऱ्या हॉटेलपैकी आमचं एक आहे’, असं राव सांगतात.

‘शारदा भवनचे ग्राहक विविध स्तरातले आहेत. टॅक्सी ड्रायव्हर, विद्यार्थी, आजबाजूच्या परिसरातील कुटुंब वर्षानुवर्षे खायला येत आहेत. काहीवेळेस चार पिढ्या एकत्र खाताना दिसू शकतात. विद्यार्थी दशकापासून इथे येणारी मंडळी आता त्यांचा नातू-नातीला घेऊन येतात. त्यावेळी सगळं आण्यात मिळायचं अशी आठवणही सांगतात’.

अनेकदा राव मंडळी जुन्या ग्राहकांबरोबर जेवतातही. गप्पा रंगतात. एसी बसवाच असा त्यांचा हट्ट नसतो. आम्हाला चांगलं रुचकर खायला मिळतं ते पुरेसं आहे असं ग्राहकमंडळी सांगतात. एवढ्या वर्षात राजकारणी, सेलिब्रेटी मंडळी इथे येऊन गेली आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते शशी कपूर, टेनिसपटू महेश भूपती आणि लारा दत्ता अशी अनेक नामवंत मंडळी इथे खाऊन गेली आहेत. मात्र त्या कोणाचेही फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाहीत. आमच्या इथे प्रत्येकजण सारखा आहे. त्यामुळे फोटो नाहीत.

ग्राहकांचा हॉटेलशी असलेला ऋणानुबंध आम्हालाही कधीतरी चकित करतो असं गणेश सांगतात. एक महिला ग्राहक कॉफी पात्र घेऊन गेली. २५ वर्षांनी ती आली होती. ती ते पात्र अमेरिकेला घेऊन गेली. ते आता आमच्या घरी आहे असं रवी राव सांगतात. दोन कुटुंबाची ही भागीदारी ९०व्या वर्षात आहे. ३५ वर्षीय कैलाश राव आणि श्रीधर राव यांचा मुलगा हा ऋणानुबंध उलगडतात.

‘माझे आजोबा होते तोपर्यंत त्यांचा शब्द अंतिम मानला जात असे. त्यांना शंकरनारायण रावांची भक्कम साथ असे. ८०च्या दशकात माझे आजोबा गेले. तेव्हापासून शंकरनारायण राव हेच आता आमचे वडीलधारे आहेत. त्यांचा अनुभव प्रमाण आहे. ही परंपरा आजही कायम आहे’.

‘विश्वास हा कोणत्याही भागीदारीत महत्त्वाचा असतो. आमच्याकडे तो आहे’, असं रवी अभिमानाने सांगतात. ‘तो फक्त हॉटेलपुरता मर्यादित राहिलेला नाही. समजा एखाद्या दिवशी माणूस पाकीट विसरला तर आम्ही त्याला खाऊन घ्यायला सांगतो. पैसे उद्या दे असं सांगतो. आम्ही ते वहीत मांडून ठेवत नाही. तो माणूस विश्वासाने पैसे देतो’.

तिसऱ्या पिढीने दशकभरापूर्वी हॉटेलचं काम समजून घ्यायला सुरुवात केली. कोल्ड फिल्टर कॉफीसारखा पर्याय त्यांनी मेन्यूत वाढवला. पण इथे बदल सावकाश होतात. नव्या ग्राहकांसाठी नव्या चवीचे पदार्थ येतील पण ताजं सकस अन्न, वर्षानुवर्षांचा ऋणानुबंध, पाकीट नसल्यास खाऊ घालण्याची वृत्ती कायम राहील.