शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ते त्यांची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत आहेत, असा आरोप केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. यावर आता शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शीतल म्हात्रे म्हणाल्या, “आज मला वाईट वाटतं की, ज्या व्यक्तीने मला अग्निकन्या म्हटलं होतं अशा संजय राऊतांनी हे अश्लील वर्तन असल्याचं म्हटलं. तसेच मला अटक करण्याची मागणी केली. संजय राऊतांचेही व्हिडीओ आहेत. ते महिलांशी कशा पद्धतीने फोनवर बोलले आहेत त्याचे व्हिडीओ युट्युबवर आजही आहेत. अशा व्यक्तीने माझ्याविषयी असं बोलावं म्हणजे यांची काय मानसिकता आहे हे कळतं.”

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

“बाळासाहेब असते तर महिलांना असं वागवलं गेलं नसतं”

“हे कुठल्या महिलांना सन्मान देणार आहेत. हे शिवाजी महाराजांचं नाव सांगतात, बाळासाहेबांचं नाव सांगतात. मात्र, बाळासाहेब असते तर महिलांना असं वागवलं गेलं नसतं याची मला खात्री आहे,” असं मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले होते, “या वादग्रस्त व्हिडीओशी महाविकासआघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काडीचाही संबंध नाही. ते त्यांची पापं लपवण्यासाठी, त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असतील तर ते कायद्याचं राज्य नाही.”

हेही वाचा : VIDEO: शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यामागे…”

“सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करण्यांवर गुन्हे दाखल करा”

“मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही. माझ्या सकाळीच त्याविषयी वाचनात आलं. मुळात सार्वजनिक कार्यक्रमात कुणी अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत,” असं संजय राऊत म्हणाले होते.