scorecardresearch

Premium

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी, दोघेजण ताब्यात

शिल्पा शेट्टीच्या घरी आठवडाभरापूर्वी चोरी झाली होती या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Shilpa Shetty House Robbed
शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी झाली होती त्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी चोरी झाली आहे. शिल्पा शेट्टी जुहूच्या राहत्या घरी चोरी झाली आहे. शिल्पाच्या घरी चोरी झाली आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. शिल्पाच्या घरी एक आठवड्यापूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरातील महागड्या वस्तूंची चोरी झाली होती. त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली होती. आठवड्याभरापूर्वी चोरी झाल्यानंतर पोलिसांना आता या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलं आहे. मिड-डेने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी शिल्पाच्या घरातून चोरी केलेल्या वस्तू जप्त केल्या असल्याचीही माहितीही समोर आली आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवत चोरांचा छडा आठवडाभरात लावला आहे.

beef smuggling in gondia, 2 beef smuggler arrested in gondia, salekasa area beef smuggling
साडेचार क्विंटल गोमांसाची तस्करी, दोन आरोपी ताब्यात
sachin vaze
खंडणी प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन
explosives buried by Naxalites Gadchiroli
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

शिल्पा कायमच तिच्या सिनेमांसह तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. शिल्पा वयाची ४५ वर्षे उलटूनही अत्यंत फिट अँड फाईन आहे. राज कुंद्रावर जे आरोप झाले होते आणि त्याला जे तुरुंगात जावं लागलं होतं त्यावेळीही शिल्पा चर्चेत आली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shilpa shetty house robbed mumbai police detained two person scj

First published on: 15-06-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×