shinde government will collapse anytime sharad pawar s prediction zws 70 | Loksatta

‘शिंदे सरकार कधीही कोसळेल’ ; शरद पवार यांचे भाकीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही.

‘शिंदे सरकार कधीही कोसळेल’ ; शरद पवार यांचे भाकीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रविवारी रात्री झाली. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले. तसेच भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे, असेही पवार यांनी विशद केले.

ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.

 दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
औरंगाबाद नामांतरावरून शिवसेना- भाजप सभागृहात एकत्र

संबंधित बातम्या

विश्लेषण: मुंबई सुशोभीकरण प्रकल्प कसा आहे?
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने वाद; डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान
मोदींच्या गुजरातमध्ये सात महिन्यांपूर्वीच नोटा रद्द?
भाजपापुरस्कृत दौऱ्यावर कोण गुन्हे दाखल करणार?; राज ठाकरेंच्या आरोपांनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
कलानगर स्कायवॉकचे पाडकाम लवकरच ; पुनर्बाधणी ऑक्टोबरपासून

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : सुपरहिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा मॅजिकल टच कसा ठरतो यशाचा हीट फॉर्म्युला?
FIFA World Cup 2022: ब्राझीलच्या पराभवानंतर संघात अस्वस्थता प्रशिक्षक टिटे यांनी घेतला मोठा निर्णय
नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”
“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन