मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. असे असताना वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आहे. 

हेही वाचा <<< दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्धार

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

हेही वाचा <<< मराठवाडा मुक्ती संग्राम अभ्यासक्रमात घ्या – राज ठाकरे

बंडखोर गटाच्या आमदारांच्या अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारण्यात आल्यास शिंदे गटाला ‘बीकेसी’चा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झाले आहे.  

हेही वाचा <<< दोनतृतीयांश आमदारांच्या पक्षांतरावर दोन राज्यांमधील भिन्न भूमिका; गोव्यात काँग्रेस बंडखोरांचा गट भाजपमध्ये विलीन; राज्यात शिंदे गटाचा शिवसेनेवरच दावा

गेली अनेक वर्षे नियमितपणे शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे. मात्र शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचा फटका यंदा दसरा मेळाव्यालाही बसण्याची चिन्हे आहेत. शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेबरोबरच बंडखोर आमदारांच्या गटानेही अर्ज केला आहे, परंतु शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर घेण्याचा पर्याय शिंदे गटापुढे असणार आहे, तर शिवसेनेची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा <<< फॉक्सकॉनकडून किती लाच मागितली होती?; आशीष शेलार यांचा महाविकास आघाडीला सवाल

घडले काय?

‘एमएमआरडीए’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाडय़ाने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला.