scorecardresearch

Mumbai Municipal Election : “शिवसेना आणि आमचा निर्णय झाला आहे, आता केवळ…” प्रकाश आंबेडकरांचं विधान!

“राष्ट्रवादीचा खुला विरोध तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे.” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Mumbai Municipal Election : “शिवसेना आणि आमचा निर्णय झाला आहे, आता केवळ…” प्रकाश आंबेडकरांचं विधान!
(फोटो लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

आगामी काळात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूत शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. वंचित बहुजन आघआडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या भूमिकांबद्दलही विधान केलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेना आणि आमच्यातच बोलणी सुरू आहे. दोघांनीही एकमेकांना शब्द दिला आहे की, आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीस एकत्रितपणे सामोरं जायचं आहे आणि पुढील निवडणुका आल्यातर त्या निवडणुकाही एकत्रितपणे लढायच्या आहेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत यांच्या बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झाला असल्याची सध्याची परिस्थिती आहे.”

याचबरोबर, “शिवसेनेचा त्यामध्ये हा प्रयत्न आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हटलंय की आमचा विरोध नाही. परंतु सूत्रांकडून आम्हाला असं कळालं आहे की, राष्ट्रवादीचा यासाठी विरोध आहे. काँग्रेसचाही छुपा विरोध आहे. राष्ट्रवादीचा खुला विरोध आहे. गरीब मराठा सत्तेत येण्याला त्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्यांचा वंचितला विरोध आहे.” असंही यावेली प्रकाश आंबेडकर म्हणाले.

याशिवाय, “शिवसेना आणि आमचा निर्णय झाला आहे, आता केवळ आम्हाला एकत्रितपणे जाहीर करायचं बाकी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबाबत शिवसेनेलाच निर्णय घ्यायचा आहे. तसेच, शिवसेनेसोबतच्या चर्चेअगोदर आम्ही महानगरपालिकेच्या ८३ जागांवर तयारी केली होती.” असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 21:53 IST

संबंधित बातम्या