शिवसेना-भाजपाच्या दोस्तीत कुस्ती सुरुच : राष्ट्रवादी

गेल्या चार वर्षात आपल्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात ठेवण्याची भाषा करीत शिवसेनेने युती पणाला लावत भाजपावर वारंवार वार केले. मात्र, आता पुन्हा सत्तेसाठी युती झाल्यानंतरही शिवसेनेकडून भाजपावर टीका सुरुच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली असली तरी अद्यापही उद्धव ठाकरे नाराज असल्याचे चित्र आहे. कारण, भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यावरुन भाजपा राजकारण करीत असल्याचे सुचक विधान नुकतेच उद्धव ठाकरे यांनी केले होते. याचा दाखला देताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना-भाजपा युतीवर भाष्य केले आहे.


गेल्या चार वर्षात आपल्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात ठेवण्याची भाषा करीत सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेने युती पणाला लावत भाजपावर वारंवार वार केले. मात्र, आता पुन्हा सत्तेसाठी युती झाल्यानंतरही शिवसेनेकडून भाजपावर टीका सुरुच आहे.

कारण, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईचे श्रेय घेण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

लष्करी गणवेशाचा वापर करून मतांचा जोगवा मागणारे दोषीच अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपाने युती केली असली तरी त्यांची अद्यापही दोस्तीत कुस्ती सुरूच आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena bjp still fighting with each other says ncp