scorecardresearch

शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजक; भाजपचे टीकास्त्र 

शिवसेनेच्या गुंडगिरी व दहशतीमुळे राज्यात अराजक निर्माण झाले आहे, असे टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शिवसेनेच्या गुंडगिरी व दहशतीमुळे राज्यात अराजक निर्माण झाले आहे, असे टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडले आहे. याविरोधात  भाजप लोकशाही मार्गाने लढा देईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या पोलखोल यात्रेवर आणि मोहित कंभोज यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हा सरकार पुरस्कृत दहशतवाद पोलीस यंत्रणा निमूटपणे पाहात आहे. पोलखोल यात्रेत अडथळे आणण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ही यात्रा सुरूच राहील. या गुंडगिरीला जशास तसे उत्तर भाजप कार्यकर्ते देऊ शकतात, मात्र आम्ही या विरोधात पोलीस आयुक्तांकडे दाद मागून लोकशाही मार्गाने लढा देऊ. पवारांचा न्याय सर्वाना का नाही?

 शरद पवार यांच्या घरापुढे आक्रमक आंदोलन करणाऱ्यांना तातडीने पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळय़ा कलमांखाली गुन्हे दाखल झाले. पोलखोल यात्रेवरील हल्लेखोर व राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत. हल्लेखोरांना वेगळा न्याय का, असा सवाल शेलार यांनी केला. मोहित कंभोज यांच्यावरील हल्ला हे पळपुटेपणाचे लक्षण आहे, अशी टीका आमदार आशीष  शेलार यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena bullying causes state bjp shiv sena bullying terror construction ysh