मुंबई : शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नवा पक्ष काढावा, असे आव्हान देत एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नव्हे तर दगाबाज मुख्यमंत्री असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता पुन्हा आपल्याला शिवसैनिकांमधून मोठे नेते तयार करायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेतील पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यासह उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. त्या बैठकीत शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. भाजपला शिवसेना संपवायची होती. त्यासाठी हे सारे कारस्थान रचले. शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर आता हे लोक शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नवा पक्ष काढावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नसून दगाबाज मुख्यमंत्री आहेत. त्यांना  राजकीय स्वार्थासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र हवे आहे. पण बाळासाहेबांचा मुलगा नको आहे, असेही ठाकरे म्हणाले.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

ठाकरे कुटुंबातील सदस्यांचा शिंदे यांना पाठिंबा

आमदार-खासदार आणि पक्ष संघटनेत फूट पाडल्यानंतर आता शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना  कौटुंबिक पातळीवर राजकीय धक्का देण्याची तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.