scorecardresearch

शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; शहर प्रमुखास महिला शिवसैनिकांची मारहाण!

यामुळे एकप्रकारे शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाईंदर शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना पक्षांतर्गत वादामुळे शिवसेनेच्या शाखेच्या बाहेर महिला शिवसैनिकांनी सर्वांसमोर मारहाण केली. मारहणाची चित्रफित समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामुळे एकप्रकारे शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

पप्पू भिसे हे भाईंदर शिवसेना शहरप्रमुख आहे. आज (रविवार) दुपारी शिवसेनेचा एक पक्षांतर्गत कार्यक्रम होता. त्यावेळी महिला शहर संघटक वैदेही परूळेकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर परुळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम मारहाण केली.

या मारहणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात सर्वत्र व्हायरल होत असून, जोरदार चर्चा देखील सुरू आहे. तसेच, या प्रकरणी शहरप्रमुख पप्पू भिसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे,अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे. तर, भिसे यांच्या तक्रारीवरून परुळेकर यांच्याविरोधात मारहणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून हा वाद निर्माण झाला होता. भिसे यांनी शाखेत शिवीगाळ केल्याने शाखेबाहेर नेऊन मारहाण केल्याचे परूळेकर यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena city chief beaten by womens shiv sainiks msr