scorecardresearch

नवाब मलिक यांना पाठिंबा कसा देता?; एकनाथ शिंदे यांना भाजपचा सवाल

मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी युतीच्या काळात भाजपनेही मेहनत केली.

ED summons Kaptan Malik Nawab Malik brother

एकनाथ शिंदे यांना भाजपचा सवाल

डोंबिवली: शिवसेनेने नेहमीच काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेऊन राजकारण केले. आता तीच शिवसेना, त्यांचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. मलिक यांच्या कृत्यांना तुमचा पाठिंबा अगतिकतेतून की मनापासून आहे, असे आव्हान भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिले.

मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी युतीच्या काळात भाजपनेही मेहनत केली. शिवसेना, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकार्य आणि खासदारांच्या विजयात भाजपचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हा प्रश्न करण्याचा भाजप म्हणून आम्हाला अधिकार आहे. त्याचे उत्तर पालकमंत्री शिंदे यांनी द्यावे, असे आमदार चव्हाण म्हणाले.

मुंबई बॉम्बस्फोटामध्ये आरोपी नव्हे पुराव्यासह दोषी ठरवून जन्मठेप भोगत असलेल्या शाहवली खान याच्याशी मलिकांचे थेट व्यवहार आहेत. तशी कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. मलिकांचा मुलगा फराझ, शहावली खान यांचे व्यवहार ईडीने न्यायालयात दाखल केले आहेत, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

‘मलिकांचा राजीनामा मागणे चुकीचे’

पुणे : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर सन १९९३ चे प्रकरण उकरून काढून कारवाई केली जात आहे. राज्यातील मंत्र्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर राजीनामा घेतल्यास सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील. राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्यांना देखील अटक झाल्यानंतर त्यांचा राजीनामा कोणी मागितला नव्हता आणि घेतलाही गेला नाही. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे, अशी टिपणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena congress nationalist nawab malik minister eknath shinde akp

ताज्या बातम्या