मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत या राज्य सरकारच्या आदेशाचे मनसेकडून स्वागत झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी शिवसेना सरसावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दहिसरमधील व्यापाऱ्यांना मराठी भाषेतील फलक मोफत देण्याची तयारी शिवसेनेच्या नगरसेविकेने दाखवली आहे.

करोनाकाळात आर्थिक घडी विस्कटल्यामुळे हा वाढीव खर्च करण्यास काही दुकानदारांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यांच्यासाठी मराठी भाषेतील पाटी मोफत  देण्याचा निर्णय दहिसरमधील नगरसेविकेने घेतला आहे.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांवरील नामफलक मराठी भाषेमध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र  करोनाकाळात आधीच नुकसान सोसावे लागत असताना आणखी हा खर्च कसा करणार, असा सवाल व्यापारी संघटनानी केला होता. कोणाला असे फलक लावणे आर्थिक कारणांमुळे परवडत नसेल तर त्यांना मराठी भाषेतील फलक मोफत बनवून दिले जातील, असे आवाहन दहिसरमधील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केले आहे. दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील दुकानदारांनी शिवसेनेच्या शाखेत संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ज्या दुकानदारांना मराठी छपाईबाबत माहिती नसेल तर त्यांनी मदतीकरिता संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.