scorecardresearch

आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

रजनी यांनी घरघुती वादातून  आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shiv Sena MLA Mangesh Kudalkar (Facebook/@mlamangeshkudalkar)

मुंबई : कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (वय ४२) यांनी रविवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नेहरूनगर येथे केदारनाथ मंदिर परिसरात आमदार कुडाळकर राहतात. रविवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना, त्यांच्या पत्नी रजनी यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला. रजनी या मंगेश कुडाळकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.  वर्षभरापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ला परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. रजनी यांनी घरघुती वादातून  आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena mla mangesh kudalkar s wife commits suicide zws

ताज्या बातम्या